राँग नंबरवरून सुरू झाली लव्हस्टोरी, गर्लफ्रेंडला भेटायला गावात आला अन् घडलं असं काही

एकेदिवशी त्याचा Unknown नंबरवरुन कॉल आला आणि तिने सहज फोन उचलला. हाच त्या दोघांचा पहिला संवाद. पुढे हा संवाद वाढत गेला. दिवसरात्र एकमेकांना फोनवर बोलणं सुरू झालं. दोघांच्याही मनात प्रेमाच्या कळू खुलू लागल्या. मग हळूहळू बाहेर गाठीभेटीही वाढल्या. पण एकदा त्याने तिला भेटण्यासाठी तिच्या गावी जाण्याचं धाडस केलं आणि गावकऱ्यांनी दोघांना रंगेहाथ पकडलं. इतकंच नव्हे तर गावकऱ्यांनी त्या दोघांचं अवघ्या अडीचशे रुपयात लग्नही लावून दिलं. हे संपूर्ण प्रकरण सिवान जिल्ह्यातील एमएच नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसरी खुर्द गावाशी संबंधित आहे.

जीरादेई गावातील रहिवासी दूधनाथ साह यांचा मुलगा नीरज कुमार आणि एमएच नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसरी खुर्द येथील रहिवासी सुनीता फोनवर बोलले, पुढे संवादाचं रुपांतर प्रेमात कधी झाले, हे दोघांनाही कळले नाही. गेले दीड वर्ष भेटीगाठी सुरू होत्या. यानंतर प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या गावी पोहोचला. याची माहिती परिसरातील ग्रामस्थांना समजली. यानंतर गावकऱ्यांनी दोघांना रंगेहाथ पकडलं.

विचारपूस केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. प्रियकर नीरजने सांगितले की, दोघांच्या कुटुंबीयांच्या संमतीने त्यांनी लग्न केले. दोन्ही कुटुंबांची बदनामी होईल असे कोणतेही काम करणार नाही. देवाला साक्षी मानून लग्न केले. दोघांमध्ये सुमारे दीड वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते, असे प्रियकराने सांगितले. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.