पोस्ट ऑफिस की एसबीआय कोण देणार नवीन वर्षात एफडीवर अधिक रिटर्न ?

जेव्हा कोणती गुंतवणूक करायची योजना बनवतो तेव्हा धोका आणि फायदा याविषयी आवर्जून विचार करतो. ज्यासाठी आपण बँकांच्या योजना बघतो किंवा पोस्ट ऑफिस योजना बघतो. तसेच सिक्स डिपॉजिटवच्या गुंतवणूकवर चांगला रिटर्न मिळतो आणि ही एक जोखीम मुक्त योजना आहे. पोस्टाच्या योजनेला वृद्ध लोकांकडून सर्वाधिक पसंती मिळाली आहे. यामध्ये इन्कम टॅक्स कायद्याचे कलम 80 सी कर सुटचा लाभही गुंतवणुकीवर दिला जातो. एफडी बँक आणि पोस्ट ऑफिस या दोन्हीद्वारे ऑफर केली जाते. येथे तुम्हाला माहिती देत आहोत की नवीन वर्षात,एसबीआय आणि पोस्ट ऑफिस एफडी मध्ये गुंतवणूक करणे योग्य असू शकते.

एसबीआयमध्ये किती रिटर्न मिळतात
बँक लागू व्याज तिमाही आधारावर किंवा परिपक्वतेवर देते. मुदत ठेवी बारा महीने किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी मुदत ठेव उघडल्यास ठेवीदारांच्या सोयीनुसार मासिक किंवा सहमाही किंवा वार्षिक कालावधीत व्याज देतात.कोणताही नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.या योजनेअंतर्गत तुम्ही कर्ज देखील घेऊ शकतात.एसबीआय बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यत गुंतवणुकीवर 2.9 ते 6.2 टक्के व्याज देत आहे.

पोस्ट ऑफिसची एफडी
पोस्ट ऑफिस एफडीबद्दल सांगायचे तर आता पोस्टात खाते उघडणे अतिशय सोप्पे झाले आहे.यामध्ये जवळच्या कोणत्याही पोस्टात तुम्ही जाऊन बँक खाते उघडू शकता. या योजनेकरता किमान 1000 रुपये रक्कम भरावी लागते. तुम्ही अगदी लाखों रुपयापर्यतची एफडी करू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये 1 वर्ष,2 वर्ष, 5 वर्ष इतके वर्ष रक्कम ठेवू शकता.1 ते 3 वर्षासाठी 5.5 टक्के व्याज देतात तर 5 वर्षासाठी 6.7 टक्के व्याज दिले जाते.