गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा; प्रेक्षकांच्या गोंधळामुळे ग्रामपंचायतीच्या गाळ्यांचे पत्रे फुटले

अहमदनगर- गौतमी पाटील (Gautami Patil) हे महाराष्ट्रभर गाजत असलेलं नाव आहे. नृत्यांगणा गौतमी पाटीलची क्रेझ लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आहे. हल्ली छोटे मोठे वाढदिवस असो, गावजत्रा असो गौतमी पाटीलचा डान्स कार्यक्रम फिक्स असतो. मात्र या कार्यक्रमात बऱ्याचदा राडेही होताना दिसतात. अहमदनगर जिल्ह्यातील एका गावात आयोजण्यात आलेल्या कार्यक्रमात पुन्हा राडा झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

पारनेर तालुक्यातील जवळे येथे पैलवान जयदीप सालके आणि सौरव लोखंडे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त लावणी नृत्यांगना गौतमी पाटील च्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात प्रेक्षकांनी गौतमी पाटीलच्या अदाकारींवर ठेका धरत कार्यक्रमात धुडगूस घातला. यावेळी प्रेक्षक गौतमीच्या अदाकारींवर बेभान होऊन नाचले. तर काही प्रेक्षक कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामपंचायतने बांधलेल्या गाळ्यांवरती चढल्याने अनेक गाळ्यांचे पत्रे हि फुटले. त्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. आणि पुन्हा एकदा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ पाहायला मिळाला.