मोदींनी दिलेला स्वच्छतेचा संदेश तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम गिरीश खत्री करत आहेत – मोहोळ 

एखादा उपक्रम सुरु करणे आणि त्यात सातत्य राखणे हे महत्वाचे असते - मोहोळ 

पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा नारा दिला आहे. हा नारा खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी भाजपनेते गिरीश खत्री हे प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.  गिरीश खत्री यांनी गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवांप्रमाणे ‘स्वच्छता’ हा देखील एक उत्सव व्हावा यासाठी एक चालवलेले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. यातूनच भारतीय जनता पक्ष आणि गिरीश खत्री मित्रपरिवाराच्या (Girish Khatri Mitra pariwar) वतीने ‘ नमो करंडक स्पर्धा – २०२२’ (NaMo karadankad spardha2022)या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, या अद्वितीय अशा स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला असून, प्रामुख्याने सोसायटी आणि अपार्टमेंटच्या स्वच्छतेवर अधिक भर दिला जाणार आहे. स्पर्धेचे यंदा दुसरे पर्व आहे. दरम्यान, या स्पर्धेला आता मोठा प्रतिसाद मिळू लागला असून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Former Mayor Muralidhar Mohol) यांनी देखील या स्पर्धेला आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच खत्री यांचे कौतुक केले आहे.

मोहोळ म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून एक स्वच्छतेचा संदेश दिला. आज आपण पाहतोय की या स्वच्छ भारत अभियानाने चळवळीचे स्वरूप धरण केले आहे. एका जनआंदोलनाच्या स्वरुपात हे सर्व सुरु आहे. स्वच्छतेचा संदेश तळागाळापर्यंत पोहचवणे हा या अभियानाचा उद्देश आहे आणि तोच उपक्रम किंवा त्याच माध्यमातून हे काम गिरीश खत्री यांनी सुरु केले. त्यांनी सोसायट्यांच्या अंतर्गत स्पर्धेच्या माध्यमातून हे काम सुरु केलं आहे.

मागच्या वर्षी या स्पर्धेत जवळपास ८० सोसायट्यांनी सहभाग घेतला. यावरीशी जवळपास २०० सोसायट्यांनी सहभाग घेतला आहे. मला असं वाटतं की एक चांगला उपक्रम गिरीशजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरु केला आहे. एखादा उपक्रम सुरु करणे आणि त्यात सातत्य राखणे हे महत्वाचे असते. हे काम खत्री यांनी केलेलं आहे. मी या उपक्रमाला शुभेच्छा देतो तसेच नागरिकांना तसेच सोसायट्यांना आवाहन करतो की या स्पर्धेत त्यांनी सहभागी व्हावे आणि स्वच्छतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहचवावा हीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो असं मोहोळ म्हणाले आहेत.

पालकमंत्री चंद्रकात पाटलांनीही दिल्या शुभेच्छा 

दरम्यान, या स्पर्धेला आता मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, या स्पर्धेत सर्व सोसायटी आणि अपार्टमेंटने भाग घ्यावा. स्वच्छतेच्या या उत्सवात सर्वांनी मोठ्याप्रमाणात सहभागी व्हावे. गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवांप्रमाणे ‘स्वच्छता’ हा देखील एक उत्सव व्हावा, स्वच्छता ही कायम करत राहण्याची प्रक्रिया आहे. यामुळे मी सर्व संस्था, सोसायट्या आणि अपार्टमेंटसना विनंती करतो की, हा नमो करंडक जिंकण्याच्या निमित्ताने एक चुरस निर्माण होऊ द्या आणि त्यातून सर्व अपार्टमेंट आणि सोसायट्या स्वच्छ होऊ द्या. गेल्या वर्षी मी या कार्यक्रमाला उपस्थित होतो. त्यावेळी मला खूप आनंद झाला. खूप हिरहिरीने यात लोकांनी सहभाग घेतला. याही वर्षी असाच प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा करतो असं पाटील यांनी म्हटले आहे.