कंगना रणौत घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, राजकारणात सक्रीय होणार असल्याची चर्चा

Mumbai – अभिनेत्री कंगना रणौत (Actress Kangana Ranaut) ही उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट होणार आहे. उद्या ही भेट नेमकी किती वाजता होणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, कंगना रणौत ही एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे. या भेटीत नक्की कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच कंगना राज्याच्या राजकारणात सक्रीय होणार का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.