खासदार बापट यांच्या माध्यमातून पुणे लोकसभा मतदार संघातील प्रत्येक भागात विकास कामे : महेश करपे

पुणे   : पुणे लोकसभा मतदारसंघातील विविध शिक्षण संस्थांना खासदार बापट यांच्या खासदार निधीतून संगणकाचे वाटप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगर कार्यवाह महेश करपे आणि गौरव गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले.

पुणे लोकसभा मतदार संघातील अपंग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्र, वानवडी पुणे, श्री समर्थ श्रीपती बाबा शिक्षण संस्थेचे जनता विद्यालय ताडीवाला रोड, श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या श्री शिवाजी मराठा हायस्कूल ४२५, शुक्रवार पेठ, शिक्षण प्रसारक मंडळींचे एस.पी.एम. पब्लिक इंग्लिश माध्यम शाळा, एच. व्ही. देसाई कॉलेज ५९६ बुधवार पेठ, पुणे म.न.पा. ची केशवराव जेधे शाळा क्र. १६, आणि एपीफनी स्कुल, ५ गुरुवार पेठ, पंच हौद, या शिक्षण संस्थाना ४७ संगणक, प्रिंटर व स्कॅनरचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना करपे यांनी सांगितले की खासदार बापट विकास कामे करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असतात. कोणतीही संस्था लहान असो वा मोठी त्या संस्थेची अडचण लक्षात घेवून त्यांना मदत करण्यास बापट हे सदैव तत्पर असतात. शहरातील कोणत्याही भागात गेल्यास तेथे बापट यांच्या माध्यमातून विकास कामे झाल्याचे दिसते. खासदार बापट यांना कोणत्याही विभागातून काम कसे करून घ्यावयाचे याचे पूर्ण ज्ञान आहे. आज संगणकाच्या युगात आज वाटप केलेल्या संगणकामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना अधिकच फायदा होणार असल्याचे करपे यांनी सांगितले.

यावेळी गौरव बापट, माजी नगरसेवक योगेश समेळ, कसबा भाजपा मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे, अपंग कल्याणकारी संस्थेचे मुरलीधर कचरे, श्री.शिवाजी मराठा संस्थेचे श्री.जेधे, कसबा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अमित कंक, महिला अध्यक्षा अश्विनी पांडे, छगन बुलाखे, राजेंद्र काकडे, राजू परदेशी, अरविंद कोठारे, निलेश कदम, दादा खत्री, भस्मराज तिकोने, प्रणव गंजेवाले, सुरेंद्र ठाकूर, गणेश परदेशी व इतर संस्थांचे मुख्याध्यापक, प्रतिनिधी व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.