…तेव्हा तुम्हाला ‘अच्छे दिन’ दिसतील, प्रमोद सावंतांनी डागली तोफ

म्हापसा : गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहचला असून आता प्रचार रंगात आला आहे. भाजप , काँग्रेस , आणि नव्याने गोव्यात दाखल झालेल्या आप आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांत खरी लढत पाहायला मिळत आहे.

 

विधानसभेच्या अवघ्या चाळीस जागा असणाऱ्या गोव्यातील राजकारणाची विविध कारणांमुळे देशभर चर्चा होताना दिसून येत आहे. निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपल्याने आता सर्वच पक्षांनी जोर लावला असून आज भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हापश्यात जाहीर सभा घेतली.

 

या सभेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेस नेते दिगंबर कामत यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे. ते म्हणाले ‘हे दिगंबर कामत म्हणतात तुमचे अच्छे दिन कुठं गेले अरे बाबा तुझे 2012 च्या आधीचे बुरे दिन आठव मग तुला दिसतील अच्छे दिन कुठे आहे’

 

या सभेला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत,प्रभारी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक,प्रभारी सी.टी.रवी , खासदार विजय तेंडुलकर,प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यासह बार्देश मधील सर्व उमेदवारांनी हजेरी लावली.