Ravi Shastri | पराभवाच्या मालिकेदरम्यान रवी शास्त्रींनी हार्दिकला दिला मोलाचा सल्ला, मुंबई इंडियन्स करणार कमबॅक?

Ravi Shastri | मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कर्णधाराची घोषणा करताना काही गोष्टी स्पष्ट केल्या असत्या तर हार्दिक पांड्याच्या टीकेकडे दुर्लक्ष करता आले असते, असे मत भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. शास्त्रींनी हार्दिक पांड्याला शांत राहण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला आणि दमदार कामगिरीची आशा व्यक्त केली.

रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाईव्ह शोमध्ये संवाद साधताना सांगितले की, “भारतीय संघ येथे खेळत नाही. हे फ्रँचायझी क्रिकेट आहे. त्यांच्यावर मोठा खर्च होत आहे. तो बॉस आहे. त्यांनी कोणाला कर्णधार बनवायचे हा त्यांचा निर्णय आहे. बरं, मला वाटतं जर संभाषणात स्पष्टता असती तर हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता आलं असतं,” असं मत रवी शास्त्रींनी मुंबई इंडियन्सच्या निर्णयावर व्यक्त केले आहे.

ते पुढे म्हणाले, “जर तुम्हाला हार्दिक पांड्याला कर्णधार बनवायचे होते तर तुम्ही म्हणायला पाहिजे होते की आम्ही भविष्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही संघ बांधणीवर भर देत आहोत. रोहित शर्माने उत्तम कामगिरी केली आणि हे सर्वांना माहीत आहे. आम्हाला रोहितने हार्दिक पांड्याला पुढील तीन वर्षे संघाच्या प्रगतीत मदत करताना पाहायचे आहे”

मुंबई इंडियन्सचा खेळ बदलेल : शास्त्री
ते संभाषण आणि ते स्पष्टीकरण आधी आले असते तर एवढा गोंधळ झाला नसता, असे रवी शास्त्री म्हणाले. मग मुंबईला रोहित शर्मा नको आहे किंवा त्याला वाईट वागणूक मिळाली असे म्हणायला चाहत्यांना तोंड राहिले नसते. तसेच सोशल मीडियावर ज्या गोष्टी पाहायला मिळत आहेत, त्याही झाल्या नसत्या.

यावेळी मुंबई इंडियन्स जोरदार पुनरागमन करेल, असा आशावाद रवी शास्त्री यांनी व्यक्त केला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने चालू मोसमात सलग तीन सामने गमावले आहेत. शास्त्री म्हणाले की, एकदा संघ जिंकू लागला की त्याला रोखणे कठीण असते.

हार्दिक पांड्याला सल्ला
यावेळी रवी शास्त्रीने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला महत्त्वाचा सल्ला दिला. ते म्हणाले, “म्हणून माझा हार्दिक पांड्याला सल्ला आहे की शांत राहा, धीर धर आणि गोष्टींकडे दुर्लक्ष कर आणि स्वत:च्या खेळावर पूर्णपणे लक्ष केंद्रित कर. काही चांगली कामगिरी करून संघाला विजय मिळवून दे. मुंबई इंडियन्सचा संघ अप्रतिम आहे. ते एकदा जिंकले तर सतत जिंकण्याची ताकद त्यांच्यात आहे आणि मग चाहते सगळे विसरतील. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना 7 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha 2024: वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर, पुण्यातून वसंत मोरेंना दिली उमेदवारी

Murlidhar Mohol | विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे : मुरलीधर मोहोळ

Shirur LokSabha 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती