‘जे लोक निघून गेले त्या लोकांनी फक्त पक्षप्रमुखांचा विश्वासघात केला नाही तर त्यांनी जनतेचाही विश्वासघात केला’

ठाणे : शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर आता ठाकरे गटाने प्रबोधन यात्रा ((Prabodhan Yatra)सुरु केली आहे.या यात्रेची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून झाली. यावेळी नुकत्याच शिवसेनेत दाखल झालेल्या सुषमा अंधारे यांनी वर्षानुवर्षे शिवसेनेत घालवून आता शिंदेंना साथ देणाऱ्या शिवसेना नेत्यांवर टीका केली.

अंधारे म्हणाल्या, जे लोक निघून गेले त्या लोकांनी फक्त पक्षप्रमुखांचा विश्वासघात केला नाही. तर त्या लोकांनी जनतेचाही विश्वासघात केला. कारण तुम्ही शिक्के जे मारले होते त्या विचारधारा बघून मारले होते आणि नेमके त्या विचारधारेशीच या लोकांनी गद्दारी केली. मग हे विचारधारेच्या वेळेला हे लोक म्हणतात की अरे आम्ही कुठे विचारधारा सोडली? आम्ही बाळासाहेबांचेच विचारधारेचे आहोत. हे लोक बाळासाहेबांचे वारसधार कसे असतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्या म्हणाल्या, जे लोक हिंदुत्वाच्या (Hinduism) नावाखाली इतर धर्मीयांचा द्वेष करतात त्यांना कळत नाही की धर्मवीर आनंद दिघे यांचे सर्वात विश्वासू साथीदार, सहकारी, मित्र, गुरुवर्य ते साबिरभाई शेख सारखे नेते होते. त्या साबिरभाई शेख यांना तुम्ही कसे विसरु शकता? जे लोक म्हणतात की, आम्ही बाळासाहेबांचे वारसदार, बाळासाहेबांचा वारसदार असणारा माणूस आपल्याच शिवसैनिक भावाच्या विधवा पत्नीच्या विरोधात कसा उमेदवार उभा करु शकतो? तोही दुसऱ्यांचा. असं सुषमा अंधारे (Sushama Andhare) म्हणाल्या.