गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तुळजापुरात घेतले भवानी मातेचे दर्शन 

तुळजापूर –  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी बुधवार दि २२ रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरात श्री तुळजाभवानी मातेची पुजाअर्चा करुन मनोभावे दर्शन घेतले. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच देवी दर्शनार्थ येवून देविजींचा कुलधर्म कुलाचार करण्याची त्यांची इच्छा होती ती आज देविजींचा कुलकुलाचार करुन पूर्ण केली.

श्रीतुळजाभवानी दर्शनानंतर मंदीर संस्थानच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त योगेश खैरमाटे यांनी मुख्यमंत्री योगेश सावंत यांचा कवड्याची माळ घालून देविची प्रतिमा देवून महावस्त्र देवून सत्कार केला. यावेळी तहसिलदार सौदागर तांदळे, प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे,  जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, विशाल रोचकरी, पो नि अदिनाथ काशीद उपस्थितीत होते.