Karan Gaykar | करण गायकर यांना नाशिकमधून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी

Karan Gaykar | वंचित बहुजन आघाडीची लोकसभा उमेदवारांची नववी यादी जाहीर झाली असून, पक्षाच्या एक्स हॅंडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. यात जळगाव मतदारसंघातून युवराज जाधव (Yuvraj Jadhav) यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर नाशिकमधून करण गायकर (Karan Gaykar) यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.

या आधी जळगावमधून प्रफुल्ल कुमार रायचंद लोढा यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने जळगाव मतदारसंघातून प्रफुल्ल कुमार रायचंद लोढा यांच्या जागी युवराज भीमराव जाधव यांच्या उमेदवारीला मान्यता दिली आहे.

तसेच, नाशिकमधून वंचित बहुजन आघाडी कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज नाशिकमधून करण गायकर यांना उमेदवारी दिल्याने येथे जोरदार लढत होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Jay Pawar | संसदरत्न फार मोठा पुरस्कार नाही; जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर थेट टीका

Ajit Pawar | ‘बायको म्हणाली, अहो हे काम करुन द्या, तर करावेच लागणार, नाहीतर…’; अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य

Pune LokSabha | शिंदे आणि अजित पवारांची जी उंची होती, ती आज राहिली नाही; काँग्रेसच्या नेत्याने जखमेवर चोळले मीठ