Dharashiv LokSabha | ओमराजे निंबाळकर की अर्चना पाटील, धाराशिवमध्ये यंदा नवमतांचा कौल कुणाच्या पारड्यात पडणार?

देशात १८ व्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे.  उद्या राज्यातील दुसऱ्या टप्यातील मतदान होणार आहे.  धाराशिव लोकसभा (Dharashiv LokSabha) मतदारसंघात तिसऱ्या टप्यात मतदान होणार असून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे.  या मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, बसपा, शेतकरी संघटना आदी पक्षांसह अपक्ष असे ३१ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक उमेदवाराकडून आपल्याकडे मतदान खेचून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मतदारसंघातील नवमतदार कुणाच्या पारड्यात आपले मत टाकतात हे महत्वपूर्ण ठरणार आहे.

धारशिवमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी १८ लाख ८६ हजार २३८ मतदार होते. या तुलनेत सन २०२४ च्या निवडणुकीत त्यात १९ लाख ९२ हजार ७३७ अशी वाढ झाली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीसाठी प्रथमच १ लाख ६ हजार ४९९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे हे नवमतदार कोणाला कौल देणार यावरही निकालाची बरीच समीकरणे अवलंबून आहेत.

धाराशिव लोकसभेसाठी (Dharashiv LokSabha) २०१९ मध्ये ६३.४२ टक्के इतके मतदान झाले होते. तर १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यावेळी ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे मतांची विभागणी होणार का हेही पाहावे लागणार आहे. २०१९ च्या लोकसभेसाठी १८ लाख ८६ हजार २३८ मतदारांपैकी ११ लाख ९६ हजार १६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. २०२४ मध्ये १ लाख ६ हजार ४९९ मतदारसंख्या वाढली आहे. वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडते, यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. धाराशिव लोकसभेसाठी २००९ मध्ये ५४.४७ टक्के, २०१४ मध्ये ६४.४१ टक्के तर २०१९ मध्ये ६३.४२ टक्के मतदान झाले होते. २०१४ मध्ये ११ लाख १५ हजार ९९१ इतके मतदान झाले असून २०१९ मध्ये ११ लाख ९६ हजार १६६ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी मविआकडून विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, महायुतीकडून अर्चना पाटील तर वंचितकडून भाऊसाहेब आंधळकर हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी विरुध्द महायुती असा सामना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Jay Pawar | संसदरत्न फार मोठा पुरस्कार नाही; जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर थेट टीका

Ajit Pawar | ‘बायको म्हणाली, अहो हे काम करुन द्या, तर करावेच लागणार, नाहीतर…’; अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य

Pune LokSabha | शिंदे आणि अजित पवारांची जी उंची होती, ती आज राहिली नाही; काँग्रेसच्या नेत्याने जखमेवर चोळले मीठ