श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे पवारांना पळून जावं लागणार; पडळकरांचा घणाघात 

बारामती – 2024 ला पवारांचे विसर्जन करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) बारामतीत आले आहेत. श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे शरद पवारांना (Sharad Pawar) पळून जावं लागणार असल्याचा हल्लाबोल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी एका मेळाव्यात  केला.

गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की, एखाद्याला फसवून घ्यायचं लुबाडून घेण्यात बारामतीकारांना फार आनंद असतो. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा सुप्रिया सुळे या वरमाई सारख्या फिरत होत्या.  निर्मला सीतारामन या बिनटाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. बारामती लोकसभेचे कधी ऑपरेशन होईल हे पवारांना कळणार देखील नसल्याचे पडळकर यांनी म्हटले.

मी दोन वर्ष ही टेकडी ठोकून काढत आहे. पवारांचे राजकारण हे पोलिसांवर चालते. माझ्यावर खूप केसेस आहेत. या केसेस म्हणजे अंगावरील दागिना समजा असेही पडळकरांनी कार्यकर्त्यांना म्हटले. अजित पवारांनी बंड केले तेव्हा दोन तृतीयांश आमदार त्यांच्या मागे राहिले नाहीत. एकनाथ शिंदे 50 आमदार घेऊन गेले. फडणवीस यांना यांना सत्तेत बसू द्यायचं नव्हतं. तरीदेखील ते सत्तेत आले, हे शरद पवारांचे दुःख असल्याचे पडळकर यांनी म्हटले.