‘राष्ट्रवादी भाजपला वाढविण्यासाठी त्यांच्याशी साठंगाठं करीत काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न करीत आहे’

उदयपुर – महाविकास आघाडीत सत्तेचा उपभोग घेणारे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकमेकांवर चिखलफेक करत असल्याचे दिसून येत आहे. यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा नाना पटोले आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Sharad Pawar and Ajit Pawar) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

राष्ट्रवादीचा भाजपसोबत मिळून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न आहे.  तर पवार कुटुंबाचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. राष्ट्रवादीचं भाजपशी साटंलोटं असून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न आहे, अशा शब्दात नाना पटोलेंनी हल्लाबोल केला आहे. उदयपूरमध्ये काँग्रेसचं नवसंकल्प शिबिर सुरु आहे. याठिकाणी एबीपी माझाशी बोलताना पटोले यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.

2010 पासूनची यादी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वाचून दाखवण्यात आली असती तरी ती केवळ राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्यामुळेच असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. ज्या लोकांचा ते उल्लेख करताय ती लोक आज भाजपमध्ये (BJP) आहेत. म्हणून राष्ट्रवादीकडून दाखवण्यात येणारी यादी म्हणजे आपले पाप लपविण्यासाठी केलेला एक अयशस्वी प्रयत्न आहे, असंही पटोले म्हणाले.

नाना पटोलेंनी म्हटलं की, पहाटेच्या शपथविधीनंतर (Morning swearing) भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) निर्णय घेतला, तो आम्ही पाळला आहे. मात्र राष्ट्रवादी भाजपला वाढविण्यासाठी त्यांच्याशी साठंगाठं करीत काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांचा आम्ही विरोध करतो असा टोला नाना पटोंलेंनी पवारांना लगावला आहे.