जेएनपीए देशांच्या विकासात मोठे योगदान देणारे बंदर – संजय बनसोडे

JNPA Port of container transport– जवाहरलाल नेहरू प्राधिकरण हे देशातील सर्वांत जास्त कंटेनर वाहतूकीचे बंदर असून राज्याच्या विकासात व देशाच्या जीडीपीमध्ये महत्त्वपुर्ण योगदान देत आहेत. या बंदराची क्षमता व भविष्यातील नियोजनाचा विचार करता टर्मिनल १ व २ चे काम पुर्ण झाल्यास १०० लाख कंटेनरचे प्रतिवर्षी दळणवळण करता येईल. त्यामुळे देशांच्या विकासात मोठे योगदान देणारे जेएनपीए बंदर असेल असा विश्वास बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला.

संजय बनसोडे यांनी उरण येथील जेएनपीएला भेट देऊन जेएनपीए व वाढवण बंदराच्या अनुषंगाने सविस्तर आढावा बैठक घेतली.

या बैठकीला जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ, बंदरे विकास विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात, जनरल मॅनेजर मनिषा जाधव, मुख्य जनरल व्यवस्थापक जी. वैद्यनाथन, मुख्य जनरल व्यवस्थापक थॉमस, मुख्य जनरल व्यवस्थापक नितीन बोरगावकर, कॅप्टन बाळासाहेब पवार आणि प्राधिकरणाचे पदाधिकारी उपस्थित होते.

जवाहरलाल नेहरू बंदराची क्षमता व भविष्यातील नियोजन पाहता राज्यातील कृषी, औद्यागीकरणाच्या विकासाला चालणा देणारे ठरणार आहे. विशेषत: जेएनपीए- जालना- वर्धा या ट्रान्सपोर्टमुळे शेतकरी व व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच जेएनपीए हे बंदर लोहमार्ग, महामार्ग आणि हवाई मार्ग यांना जोडले गेल्यामुळे मोठी कनेक्टीव्हीटी निर्माण झाली आहे, असेही संजय बनसोडे म्हणाले.

https://youtu.be/igs_KEHGv_g?si=93eBUKyMvxt2A_6b

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय सैनिक अरुणाचल प्रदेश व पंजाबसह सीमावर्ती भागात करणार ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

Rahul Gandhi की Arvind Kejriwal! 2024 साठी विरोधकांचा चेहरा कोण?

Loksabha Election : पुणे लोकसभेच्या भाजपा समन्वयकपदी श्रीनाथ भिमाले !