आमदार अमोल मिटकरी आमच्या संपर्कात आहेत; शिंदे गटातील मंत्र्याचा गौप्यस्फोट

अकोला :  राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी  यांनी आताच्या सरकारमधील अनेक लोक आणि शिंदे गटातील बंडखोर आमदार आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याचं मिटकरी म्हणाले होते. मिटकरींच्या विधानावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनीही पलटवार केलाय.

मिटकरींवर पलटवार करताना अब्दुल सत्तार यांनी खळबळजनक दावा केलाय. राष्ट्रवादीतून अनेक लोक आमच्याकडे येतात. अमोल मिटकरी सुद्धा आमच्या संपर्कात आहेत, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. सत्तार अकोला दौऱ्यावर होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केलाय.

सध्या राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांकडून आमदार अमोल मिटकरींवर अनेक आरोप होत आहेत. त्याची राज्यभर चर्चाही होत आहे. या संदर्भात सत्तार यांना विचारले असता, मिटकरींना एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे नेऊन तपासावं लागेल. डॉक्टरच सांगू शकतील, त्यांना नेमकी काय अडचण आहे असा खोचक उत्तर त्यांनी दिलं.