50 खोके नागालँड ओके; गुलाबराव पाटलांनी विधानसभेत राष्ट्रवादीची केली धुलाई 

मुंबई – नागालँडमधील एनडीपीपी-भाजप (NDPP-BJP) आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. सत्तेसाठी भाजपच्या मांडीला मांडी लावण्याच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. यावरुन आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी नागालँडमध्ये पन्नास खोके, एकदम ओके झाल्याचा आरोप केला. या देशात आणि राज्यात बदलाचे वारे वाहायला लागले अशी वक्तव्य आम्ही टीव्हीवर बघत आहोत. नागालँडमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपाच्या फक्त मुख्यमंत्र्याला पाठिंबा दिला आहे. म्हणजे बदलाचे वारे नेमके कसे वाहायला लागले आहेत? नागालँडमध्येही ५० खोके, बिलकुल ओके असं काही झालंय का? एकीकडे इथे जातीयवादी सरकार म्हणून आरोप करायचे आणि दुसरीकडे मांडीला मांडी लावून बसायचं असं चित्र निर्माण झालंय. ५० खोके आणि बिलकुल ओके, नागालँड ओके असं झालंय का?” असा खोचक सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.