जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटू, एकीने तर विना कपड्यांचे फोटोशूट करत इंटरनेटवर लावली होती आग

महिला क्रिकेटने गेल्या काही वर्षांत जगभरात झपाट्याने आपले स्थान निर्माण केले आहे. महिला क्रिकेटपटूंच्या शानदार खेळासोबतच त्यांच्या सौंदर्यानेही चाहत्यांच्या मनावर छाप सोडली आहे. सध्या भारतात वुमेन्स प्रीमियर लीगचा थरार सुरू आहे. या लीगमध्ये जगभरातील दिग्गज महिला क्रिकेटपटू शानदार खेळ दाखवत आहेत. त्यांच्या खेळाबरोबरच त्यांच्या सौंदर्यानेही क्रिकेटरसिकांनाही भुरळ पाडली आहे. चला जाणून घेऊया जगातील अशा टॉप १० महिला क्रिकेटर्सबद्दल, ज्या अतिशय सुंदर आहेत… (Most Beautiful Women Cricketer)

५. मिताली राज
भारतीय महिला क्रिकेटचा आधारस्तंभ मानली जाणारी मिताली राज (Mitali Raj) ही जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. तिने अनेक वर्षे भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे आणि बॅटनेही अनेक उत्कृष्ट विक्रम केले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिने सहा हजारांहून अधिक धावा केल्या असून तिता विक्रम आजपर्यंत कोणत्याही खेळाडूने मोडला नाही. तिला अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारही मिळाले आहेत.

४. सारा टेलर
इंग्लंडची माजी क्रिकेटपटू आणि स्टार यष्टीरक्षक फलंदाज सारा टेलरने (Sara Taylor) तीन वर्षांपूर्वी वयाच्या 29 व्या वर्षी निवृत्ती घेतली होती. पण सारा ही इंग्लंडच्या महान महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. सारा सध्या क्रिकेटपासून दूर असली तरी ती अजूनही जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तिने विना कपड्यांचे फोटोशूट करत इंटरनेटवर आग लावली होती.

३. कायनात इम्तियाज
पाकिस्तानची अष्टपैलू खेळाडू कायनात इम्तियाजने  २०११ मध्ये आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. २९ वर्षीय कायनातची क्रिकेट कारकीर्द फारशी प्रभावी नाही, परंतु तिच्या सौंदर्याचा कोणताही सामना नाही.

२. स्म्रीती मंधाना
स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) ही भारतीय महिला संघातील सर्वात लोकप्रिय आणि स्टार खेळाडूंपैकी एक आहे. तिला लेडी सेहवाग असेही म्हणतात. डावखुरी सलामीवीर मंधाना स्फोटक पद्धतीने फलंदाजी करण्यासोबतच तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. ज्युनियर क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंधानाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. मंधानाच्या एका स्माईलवर क्रिकेट चाहते फिदा होतात. तिला क्रिकेटमधील नॅशनल क्रश असेही म्हटले जाते.

१. एलिसा पेरी
ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटर एलिस पेरी (Ellyse Perry) ही महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. महिला क्रिकेटपटूंमध्ये तिने बॅट आणि बॉलसह अनेक शानदार खेळी खेळल्या आहेत. तिला जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंमध्ये गणले जाते.