‘तो भ*वा ओवेसी औरंगजेबाच्या थडग्यावर माथा टेकवायला आला त्यावेळी आव्हाड व ब्रिगेड गप्प का होती ?’

Har Har Mahadev Controversy: ‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आक्रमक भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि कार्यकर्त्यांनी काल ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा चालू शो बंद पाडला. मात्र आव्हाड यांनी पाठ फिरवताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी शो पुन्हा चालू केला. यामुळे आता राजकारण आणखीनच तापले आहे.

दरम्यान, मनसेचे नेते गजानन काळे यांनी देखील आव्हाड यांच्यावर तोफ डागली आहे. ते म्हणाले, तो भ*वा निजामाची औलाद ओवेसी औरंगजेबाच्या थडग्यावर माथा टेकवायला आला होता त्यावेळी जितेंद्र आव्हाड व ब्रिगेड तोंडात मुग गिळून गप्प का होती ? छत्रपतींच्या स्वराज्याचा अपमान केला म्हणून त्या ओवेसीला का नाही रोखून बेड्या ठोकल्या?मराठी प्रेक्षकांवर दादागिरी करून काय शौर्य दाखवत आहात.