‘तुझे ओठ खूप सुंदर आहेत, तुला किस करू…’, अभिनेत्रीचे TMKOC शोच्या निर्मात्यावर गंभीर आरोप

तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKOC) सीरियलमधील अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने (Jennifer Mistry)  शोचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करून सर्वांनाच धक्का दिला आहे. असित मोदीने तिला त्रास देण्याचा कसा प्रयत्न केला? याची माहिती जेनिफर मिस्त्रीने मीडियाला दिली होती, त्यानंतर तिने निर्मात्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर आता अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत असित मोदींवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. जेनिफरने पोर्टलला माहिती दिली की असितने तिला आपल्या खोलीत बोलावले होते.

जेनिफर मिस्त्रीने सांगितले की, असित मोदीने तिला एकदा आपल्या खोलीत येण्याचे आमंत्रण दिले होते आणि सांगितले होते की मला तुला किस करायचे आहे. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, ‘असितने एकदा जेनिफरला म्हटले होते की तुझे ओठ खूप सुंदर दिसत आहेत, मी तुला धरून किस करू का? तू खोलीत एकटीच असतेस? तुझी पार्टनर अधिकतर वेळ खोलीत नसते. तुझी रुम पार्टनर नसेल तेव्हा माझ्या खोलीत ये, आपण मस्त दारू पिऊ.’

याबाबत जेनिफर मिस्त्रीने तिच्या पतीला सांगितले होते. जेनिफरचा नवरा म्हणाला होता, ‘तू असं का करत आहेस? तुम्ही तुमचा आत्मा विकत आहात. तू इथे का काम करतेस?’ तेव्हा जेनिफर तिच्या पतीला म्हणाली,’ ‘मी जर या लोकांवर काही कारवाई केली तर मी वेडी होईन. ते लोक मला सेटवर त्रास देतील आणि मला ते पुढे घ्यायचे नाहीत, त्यामुळे मला काम करू द्या.’ यावर हे सर्व ठीक नाही, असे तिच्या पतीने सांगितले असल्याचे अभिनेत्रीने म्हटले आहे.