हेमंत सोरेन यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; ‘या’ नेत्याच्या गळ्यात पडली मुख्यमंत्रीपदाची माळ

Hemant Soren Resigned: झारखंडमध्ये प्रचंड राजकीय खळबळ उडाली आहे. हेमंत सोरेन यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर लगेचच केंद्रीय तपास यंत्रणेने (ईडी) त्यांना अटक केली.

रांचीमध्ये पोलिसांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. ईडी कार्यालय, राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयाजवळ कलम 144 लागू करण्यात आले आहे.आता हेमंत सोरेनच्या जवळच्या चंपाई सोरेन (Champai Soren) झारखंडच्या पुढील मुख्यमंत्री असतील.

चंपाई सोरेन यांच्या आधी हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. मात्र, कल्पनाच्या विरोधात कुटुंबातून आवाज उठू लागला. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आमदार आणि पक्षाचे प्रमुख शिबू सोरेन यांची मोठी सून सीता सोरेन यांनी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या कोणत्याही हालचालीला विरोध करणार असल्याचे उघडपणे सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

आगामी निवडणुकीत भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न : नाना पटोले

देवाभाऊंची कमाल! एकाच दिवशी 3,16,300 कोटींचे सामंजस्य करार; 83,900 लोकांना मिळणार रोजगार

ईव्हीएम नसेल तर भाजप ग्रामपंचायतही जिंकू शकत नाही, संजय राऊत यांचा हल्लाबोल