मलाही मातोश्रींना भेट द्यायची आहे, काय द्यावं बरं? – निखील वागळे

मुंबई: शिवसेना नेते यशवंत जाधव, त्यांचे सहकारी आणि मुंबई महापालिकेचे कंत्राटदार यांच्या निवासस्थानी 25 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. तपासात जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरीही विभागाला सापडली आहे. याच डायरीतील एक उल्लेख राज्यभरात सध्या चर्चिला जात आहे.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डायरीतील एका नोंदीमध्ये ‘मातोश्री’ला 50 लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला 2 कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, ही बाब समोर आल्यानंतर आता शिवसेनाला सोशल मिडीयावर ट्रोल केले जात आहे.

या पार्श्वभूमीवर जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी एक लक्ष्यवेधी आणि विनोदी पोस्ट केली आहे. मलाही मातोश्रींना भेट द्यायची आहे. काय द्यावं बरं? असा खोचक सवाल वागळे यांनी फेसबुक पोस्ट करून विचारला आहे. या पोस्टच्या खाली अनेक विनोदी प्रतिक्रिया येत आहेत.