वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही – Prakash Ambedkar

Vanchit Bahujan Aaghadi | महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करून घेण्यात आल्याच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या होत्या मात्र वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत अजून समावेश झालेला नाही असा दावा वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटले आहे.

मंगळवारी (३० जानेवारी) मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितला मविआत घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा अनेक वृत्तवाहिन्यांनी केला होता. तसेच महाविकास आघाडीने अधिकृत पत्रक जारी करून वंचितला मविआत सहभागी करून घेतल्याचं जाहीर केलं होतं. या पत्रकावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. परंतु, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही, असं आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे.

अकोल्यात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, अद्याप वंचितचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. कारण वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घ्यायचं असेल तर काँग्रेसच्या वरच्या नेतृत्वाने (दिल्लीतलं हायकमांड) मान्यता दिली पाहिजे. हायकमांडने तशी मान्यता दिली आहे की नाही, हे अद्याप आम्हाला माहिती नाही. वंचितच्या मविआतील समावेशाबाबतचा निर्णय काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात घेतील, असं आम्हाला समजलं आहे. ज्या पत्रकाबद्दल सध्या चर्चा चालू आहे त्यावर केवळ नाना पटोले यांची सही आहे. त्यावर थोरात आणि चव्हाण यांची सही नाही.

महत्वाच्या बातम्या-

आगामी निवडणुकीत भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न : नाना पटोले

देवाभाऊंची कमाल! एकाच दिवशी 3,16,300 कोटींचे सामंजस्य करार; 83,900 लोकांना मिळणार रोजगार

ईव्हीएम नसेल तर भाजप ग्रामपंचायतही जिंकू शकत नाही, संजय राऊत यांचा हल्लाबोल