आई-वडिलांना देऊ शकता नाताळनिमित्त पॉकेटफ्रेंडली या ५ भेटवस्तू ; नक्की होईल कौतुक

खरंतर आपल्या कुटुंबियांना भेटवस्तू देण्यासाठीऊ काही निमित्त नसावीत . त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी त्यांना केव्हाही भेटवस्तू द्यावी . पण भेटवस्तू देताना अनेक वेळा आपण संभ्रमात पडतो कि नक्की अशी कोणती वस्तू निवडावी ज्यामुळे घेणाऱ्याला आणि देणार्याला दोघांनाही समाधान आणि आनंद मिळेल . वर्ष भरामध्ये येणारे सणवार आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटवस्तू देण्यासाठी निमित्त देताच असतात . आजपर्यंत नेहमी आपले आई वडीलच आपल्याला नाताळचे गिफ्ट देत असतील पण यावर्षी काहीतरी नवीन करू . चला तर मग नाताळाच्या निमित्ताने पाहुयात असे कोणते टॉप ५ भेटवस्तू आहेत ज्या तुम्ही देऊ शकतात .

१ . ‘ इकिगई ‘ – पुस्तक हे माणसाचे खरे मित्र आहेत . आजकल ऑनलाईनचा जमाना असला तरीही खरे पुस्तक प्रेमी हार्ड कॉपीलाच प्राधान्य देतात . जरी कोणी पुस्तक प्रेमी नसेन तरीही काही अशी पुस्तक देखील आहेत जी आवर्जून वाचावीत आणि वाचायला द्यायला हवीत . कोरोनाचा संसर्ग जरी कमी झाला असला तरी अनेक कुटुंबांची मोठी हानी झाली आहे . म्हणून ‘ इकिगई ‘ हे पुस्तक नक्की गिफ्ट करावे . सध्याच्या टॉप ५ सेल्लिंग पैकी हे एक पुस्तक आहे . जपान मध्ये एक गाव आहे जिथे लोक अगदी १५० वर्षापर्यंत जगतात . हे लोक कसे जगतात , राहतात , आचार – विचार याविषयी या पुस्तकामध्ये दिले आहे . हे पुस्तक जरूर वाचा .

२ . स्मार्ट वॉच – कोरोनाचा संसर्ग जरी कमी झाला असला तरी अनेक कुटुंबांची मोठी हानी झाली आहे . काही गॅझेट्स असे आहेत जे तुमचा हेल्थ कडे लक्ष ठेवतात . एव्हाना काहीप्रमाणात तुम्हाला शिस्त लावायला देखील मदत करतात .

३. फिश-पॉट – फिश पॉट हा देखील एक छान पर्याय आहे . सध्या बाजारात अनेक लहान मोठ्या आकाराचे फिश पॉट आणि टॅंक उपलब्ध आहेत . घराच्या आकारमानानुसार तुम्ही हे गिफ्ट देऊ शकता . यात छान असे लहान मोठे सुंदर मासे घरची शोभाही वाढवतात . तसेच या माशांच्या चपळ हालचालीमुळे मनशांती मिळते . घराला जिवंतपणा येतो .

४. रोप – अगदी २० रुपयांपासून हजारो रुपयांपर्यंत सुंदर रोप मिळतात . छान फुल देणारी किंवा शो ची रोप देखील भेट द्यायला छान आहेत . आजकाल सुंदर आकार आणि रंगाच्या कुंड्या देखील मिळतात . जसजसे हे रोप बहरात जाईल तशी तुमची आठवण भेट घेणाऱ्याला येत राहीन .

५ . टूर पॅकेज – आयुष्य त्यांनी आपल्या मुलांसाठी वेचले आहे . आता त्यांना मुक्त स्वतंत्र जगता यावं यासाठी टूर पॅकेज गिफ्ट करू शकता . अगदी आपल्या बजेट मधे असेंन ते पॅकेज द्या . रोजच्या आयुष्यातून त्यांना थोडा निवांत स्वतःसाठी वेळ मिळेल .
या सगळ्यामध्ये तुमचा वेळ देखील पूर्णपणे त्यांना द्या . ती सर्वात मोठी भेटवस्तू आई वडिलांसाठी असते .