‘ या ‘ वास्तुशास्त्र उपायांनी नष्ट होईल घरातील नकारात्मक ऊर्जा

वाढती शहरे आणि फ्लॅट संस्कृतीमुळे संपूर्ण वास्तूशास्त्रा प्रमाणे घर मिळणे आता कठीण झाले आहे , पण असे काही उपाय करून तुम्ही सुखी जीवन जगू शकता .
1) वस्तू नेहमी स्वछ ठेवावी ,फारशी पुसताना पाण्यात खडे मीठ टाकावे. मिठाने निगेटिव्ह शक्ती नष्ट होते , प्रत्येक खोलीत काचेच्या बाउल मध्ये खडे मीठ भरून ठेवावे व ते 8–15 दिवसांनी बदलावे .
2) घरात अडगळ ठेऊ नये . अडगळीमूळे नाकारात्मता वाढते , बंद पडलेली घड्याळे, इलेट्रॉनिक वस्तू घरात ठेऊ नयेत .
3)शक्य असल्यास पांढऱ्या रुईची फुले सुकवून त्याची पावडर करून कापसाच्या वाती कराव्यात व तिळाचे तेल घालून दिवा लावावा , दिवा सकाळी लावून सतत ठेवल्यास उत्तम , जर कामकाजाच्या वेळेनुसार जमत नसेल तर निदान संध्याकाळी अवश्य लावावा .
4) घराबाहेर पडताना सर्व दिवे बंद करू नयेत , एक तरी झिरो बल्प सुरू ठेवावा .
5)पूजा झाल्यावर घरात घंटा नाद , शंख नाद करावा , शंख नादाने फुफुसे भक्कम होतात , नकारात्मकता नस्ट होते , शंखाचा आवाज जिथपर्यंत जातो तिथपर्यंत virus , bacteria नष्ट होतात
6) घरासमोर रांगोळी काढावी ,रांगोळी मुळे नकारात्मकता घरात येत नाही
7) घराला उंबरा असावा त्याचे रोज पूजन करावे , हळद कुंकू वहावे .
8) घरात संध्याकाळी दत्त स्तोत्र , कुंजीका स्तोत्र , हनुमान स्तोत्र , रामरक्षा , विषुसहस्र नाम,इ,पैकी कोणत्याही स्तोत्राचे मोठयाने पठण करावे .
9) वर्ष्यातून एकदातरी गुरुचरित्राचे पारायण करावे .