‘ज्यांनी कधी निष्ठेने लोकांची सेवा केली नाही त्यांची पवारसाहेबांवर बोलण्याची कुवत नाही’

मुंबई – ज्यांनी कधी निष्ठेने लोकांची सेवा केली नाही. ज्यांनी आयुष्यभर स्वतः चा फायदा केला ते निलेश व नितेश राणे यांनी पवारसाहेबांवर बोलण्याइतपत त्यांची कुवत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी राणे भावंडांचा समाचार घेतला आहे.

पवारसाहेबांनी ५५ वर्षाच्या कारकीर्दीत जे सामाजिक, राजकीय काम केले आहे त्याच्या कणभरही काम निलेश व नितेश राणे यांनी केले नसेल आणि भविष्यात पण करू शकणार नाहीत असा आरोपही क्लाईड क्रास्टो यांनी केला आहे.

आदरणीय पवारसाहेबांचे काम अखंड सुरू राहणार आहे. त्यामध्ये दोघांच्या बोलण्याने काही फरक पडणार नाही. फक्त पवारसाहेबांचे नाव घेऊन फुकट प्रसिद्धी व भाजपात स्थान पटकावण्यासाठी धडपड सुरू असल्याचा टोला क्लाईड क्रास्टो यांनी लगावला आहे.