Ravi Rana | “इथे माझ्याशी गाठ आहे”, आमदार रवी राणा यांचा बच्चू कडू यांना इशारा

Ravi Rana | अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपाने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने प्रहार संघटनेचे बच्चू कडू नाराज आहेत. त्यांना नवनीत राणा यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून सातत्याने ते त्यांच्यावर टीका करत आहेत. अशातच नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी इथे रवी राणांसोबत गाठ आहे, असा इशारा बच्चू कडू यांना दिला आहे. नवनीत राणा या उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी येथील दसरा मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

रवी राणा म्‍हणाले, बच्‍चू कडू हे सरकारचा पूर्ण उपयोग करून घेतात, महायुतीत आहोत असे सांगतात. पण अमरावती मतदार संघात नवनीत राणांच्‍या विरोधात उभे ठाकतात. राणा यांना पराभूत करायचे आहे, असे सांगतात. राणांना पराभूत करून त्‍यांना कुणाला निवडून आणायचे आहे, हे आधी सांगा. खरे तर बच्‍चू कडू यांची ओळख एक तोडीबाज म्‍हणून आहे. कुठे पैशांचे प्रकरण आले की त्‍या ठिकाणी बच्‍चू कडू हे मधात पडतात आणि ‘सेटलमेंट’ करून घेतात, असा आरोप रवी राणा यांनी केला.

आमदार बच्‍चू कडू हे आमचे मोठे बंधू आहेत. पण, तोडीबाज म्‍हणून त्‍यांची ओळख आहे. त्‍यांच्‍या मालमत्‍तेची माहिती आपल्‍याकडे आहे. त्‍यांनी आमच्‍या विरोधात राजकारण करू नये, इथे रवी राणांसोबत गाठ आहे, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत