स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सुंपष्टात येण्याची चिन्ह 

अलिबाग : काल  झालेल्या शेकापच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील (Shekap Leader Jayant Patil) यांनी राष्ट्रवादीवर (NCP) टीकेची झोड उठवली आहे.  विधानसभा निवडणुकीत झालेल्या बंडखोरीमुळे शेकाप उमेदवारांचा पराभव झाला, एकदा फसलो असलो तरी यापुढे नाही फसणार, पराभवाचा बदला घेणार असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

जयंत पाटलांच्या या भूमिकेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सुंपष्टात येण्याची चिन्ह आहेत. जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव न घेता यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

धैर्यशील पाटील (Dharisheel Patil) यांनी काँग्रेस (Congress) विचाराशी जुळवून घेणे ही पक्षाची मोठी चूक ठरल्याची भूमिका मांडली. यापुढे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जायला नको अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणूकांमध्ये शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसते.