Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Uddhav Thackeray | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election 2024) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (ShivSena Uddhav Balasaheb Thackeray) गट हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मुंबई म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे मुंबई असे समीकरण आहे. त्यामुळे मुंबईतील सहा पैकी चार जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आल्या आहेत. मात्र उरलेल्या २ जागांवर मित्र पक्ष लढणार नसतील आम्ही उमेदवार देऊ, असे उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सांगितले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईतल्या ४ जागांवरील उमेदवारी आम्ही जाहीर केली आहे. इतर २ जागांवर आम्ही मित्रपक्षाला तुम्ही लढणार आहात का विचारलं आहे. जर ते लढणार नसतील तर आम्ही आमची उमेदवारी जाहीर करू. आमच्याकडे उमेदवार आहेत. आम्ही वाटाघाटीत ज्या ४ जागा ठरल्या त्यावर उमेदवार दिलेत. २ जागा मित्रपक्षांना तिथे लढा सांगितलंय. त्यात उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई या जागांचा समावेश आहे. आमचे कार्यकर्ते ही जागा शिवसेनेचीच असल्याप्रमाणे मेहनतीने प्रचार करतील असं त्यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha 2024: वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर, पुण्यातून वसंत मोरेंना दिली उमेदवारी

Murlidhar Mohol | विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे : मुरलीधर मोहोळ

Shirur LokSabha 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती