Gorakhpur | नवरा आणि बॉयफ्रेंड दोघांसोबतही राहायचंय, विचित्र मागणी करत तीन मुलांची आई विजेच्या खांबावर चढली

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोरखपूरमध्ये (Gorakhpur) पती-पत्नीचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे तीन मुलांची आई शेजारच्या एका तरुणाच्या प्रेमात पडली. याला पतीने विरोध केला असता महिला संतापून विद्युत खांबावर चढले. यानंतर तिने 11 हजार केव्हीएची हाय टेंशन वायर घट्ट धरली. त्यावेळी लाइन खंडित झाली हे सुदैवाने म्हणावे लागेल. तसे झाले नसते तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. त्या महिलेला कसेतरी समजावून खाली आणण्यात आले. पती-पत्नी आणि प्रियकर यांच्यात समेट घडवून आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

गोरखपूरच्या (Gorakhpur) पिपराइच पोलीस स्टेशन हद्दीतील जंगल छत्रधारी येथे राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेचे शेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत गेल्या सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. महिलेला तीन मुलेही आहेत. हा प्रकार तिच्या पतीला कळताच त्याने विरोध केला. पतीच्या समजावण्यानंतरही महिलेने ते मान्य केले नाही आणि आत्महत्येची धमकी देऊ लागली. डोक्यावरून पाणी गेल्याचे पाहून पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी महिलेला पोलीस ठाण्यात आणून तिची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान, ही महिला अचानक बाहेर आली आणि रस्त्यावरील हाय टेंशन इलेक्ट्रिक पोलवर चढली आणि वायरला धरून उभी राहिली. महिलेची ही कृती पाहून पोलीस आणि आसपासचे लोकही हादरले. त्यावेळी वीजपुरवठा खंडित झाला हे सुदैव म्हणावे लागेल. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली नाही.

दरम्यान, महिला आत्महत्या करण्याच्या धमक्या देऊ लागली. विद्युत कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने महिलेला खांबावरून खाली उतरवण्यात आले. महिला कॉन्स्टेबलसह तिला आणि तिच्या पतीला पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले. महिलेच्या पतीने गुलरिहा पोलिसांना सांगितले की, त्याच्या पत्नीचे शेजारच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांनाही एकमेकांच्या घरी जावे लागते. प्रियकरालाही महिलेला सोबत ठेवायचे असते, पण मुलांमुळे पती महिलेला सोडू इच्छित नाही. पोलीस ठाण्यात महिला प्रियकराकडे राहण्याचा हट्ट करू लागली. पती राजी न झाल्यास आत्महत्या करण्याची धमकीही तिने दिली. यानंतर तिने कबाडी रोडवरील जिल्हा आयटीआय कॉलेजजवळील रस्त्यावरील विजेच्या खांबावर चढून एचटी लाइन हाताने धरली. त्यावेळी सोसाट्याचा वारा सुटल्याने वीजपुरवठा खंडित होत होता, हे सुदैवाने म्हणावे लागेल.

महिन्याभरापूर्वीही महिलेने बीआरडी मेडिकल कॉलेजच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र ती बचावली. याआधीही तिने रेल्वे रुळावर पडून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. महिलेच्या पतीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्यास त्याला ते जबाबदार राहणार नाहीत, असे स्पष्टपणे लिहिले आहे. सध्या या महिलेच्या या कृत्याची संपूर्ण शहरात चर्चा होत आहे. याप्रकरणी विद्युत महामंडळाचे कनिष्ठ अभियंता अमितकुमार यादव यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. भविष्यात अशी घटना घडल्यास विद्युत विभाग जबाबदार राहणार नाही, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत