राणा दाम्पत्यांला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या घरासमोर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण प्रकरणी खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज त्यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात (mumbai high court) सुनावणी पार पडली. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आपल्यावर दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याच्या मागणी करणारी याचिका न्यायालयात सादर केली होती.यावेळी न्यायमुर्ती वराळे आणि मोडक यांच्या खंडपीठाने ही मागणी फेटाळून लावली आहे.

राणा दाम्पत्याचे वकील अॅड रिझवान मर्चंट (Rizwan Merchant )यांनी राणांवर दोन FIR दाखल करण्यावर आक्षेप घेतला होता. FIR नोंदवताना कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली नसल्याचं मर्चंट यांनी म्हटलं आहे. तर राणांना केवळ हनुमान चालिसा वाचायची नव्हती, तर सरकारी यंत्रणांना आव्हान द्यायचं होतं असा युक्तिवाद सरकारी वकील अॅड प्रदीप घरत यांनी केला आहे. राणा यांनी एफआयआर रद्द करण्याची मागणी याचिकेत केली होती. पण ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.

आपल्या अशिलांसोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप राणा दांपत्याकडून करण्यात आल्यावर कोर्टाने उपरोक्त बोल सुनावले. “जबाबदार पदावर असणाऱ्यांनी विशेषकरून लोकप्रतिनिधींनी एकमेकांविषयी आदराने बोलावे आणि वागावे असे आम्ही वारंवार म्हटलं आहे. परंतु त्याकडे लोकप्रतिनिधी कानाडोळा करतात. लोकप्रतिनिधींकडून याप्रकरणी काही अपेक्षा करणे चुकीचे आहे,” अशा शब्दांत कोर्टाने सुनावलं आहे.