सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात, सगळेच माझ्यासारखे नसतात – शरद पवार

पुणे : सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ ( Unwell ) होतात. सगळेच माझ्यासारखे नसतात. निवडणुकांपूर्वीच काही लोकांनी ‘मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार’, ( ‘I’ll be back, I’ll be back’ ) अशा घोषणा दिल्या होत्या. त्यामुळेच ते सध्या अस्वस्थ होत असतील, तर मी त्यांना दोष देणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना चिमटा काढला. ते सोमवारी पुण्यात ( Pune ) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सत्ता येते आणि जाते…पण त्यामुळे अस्वस्थ होण्याचं कारण नाही. पण सध्या काही लोक फार अस्वस्थ आहेत. पण त्यांना दोष देता येऊ शकत नाही. कारण निवडणुका होण्यापूर्वीच मी येणार, मी येणार अशा घोषणा त्यांनी केल्या. पण ते घडू शकलं नाही याची अस्वस्थता असते. पण या सर्वांना या परिस्थितीतून काय परिणाम हे लक्षात येईल आणि योग्य वातावरण निर्माण करण्यास सहकार्य लागेल अशी अपेक्षा करुयात, असं शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्राच्या विधीमंडळात अनेकदा यशवंतराव चव्हाण ( Yashwantrao Chavan ) मुख्यमंत्री असताना विरोधकांसोबत टोकाची चर्चा व्हायची. पण चर्चा संपल्यानंतर एकत्र बसून राज्याच्या हिताचा विचार करायचे. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण दुर्दैवाने अलीकडे नको त्या गोष्टी पहायला मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांवर धोरणात्मक टीका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण त्यांचं एकेरी नाव घेत वेडंवाकडं बोलणं शोभत नाही. असं देखील ते म्हणाले.