ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या; सुनिल तटकरेंनी पक्षाची भूमिका केली स्पष्ट

Sunil Tatkare – ओबीसींच्या आरक्षणाला (OBC Reservation) धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिले पाहिजे ही आमची त्यावेळी भूमिका होती आणि आजही तीच आमची भूमिका आहे असे स्पष्ट करतानाच बिहारच्या धर्तीवर जातीनिहाय जनगणना सरकारने जाहीर करावी अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी ओबीसी सेलच्या बैठकीत केले.

समाजाच्या आरक्षणासाठी आजच आंदोलन होत आहेत असे नाही. आज सर्व समाज आरक्षण मागत आहेत. मात्र आज महाराष्ट्रात वेगळया परिस्थितीत आरक्षणाच्या माध्यमातून एक तर्‍हेचा असंतोष निर्माण झाल्याचे चित्र निर्माण होत आहे असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले.

धनगर समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आल्यानंतर आदिवासी बांधवांची संघटना उभी राहिली. त्यावेळीही सांगितले की, त्यांना आरक्षण जरुर द्यावे मात्र आमच्या हिश्शातील काही देऊ नका असे एकंदरीत वातावरण महाराष्ट्रात आहे असेही सुनिल तटकरे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले.

आज आपण दादांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहोत. कायद्याच्या कसोटीत आणि आजपर्यंत झालेल्या निर्णयांचा विचार करता दादांच्या नेतृत्वाखाली जी भूमिका आपण घेतली आहे त्यावर निवडणूक आयोग शंभर टक्के शिक्कामोर्तब करेल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

ओबीसी सेलच्या कार्यकारिणीची बैठक आज प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यालयात पार पडली.

दादांनी एकट्याच्या स्तरावर हा निर्णय घेतला नाही तर २५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिर्घकाळ काम करणारे अभ्यासू नेते आणि राज्यभर पक्षाचे संघटन उत्तमपध्दतीने विस्तारीत करणारे सर्व प्रमुख नेत्यांनी हा सामुदायिक असा ऐतिहासिक निर्णय घेतला. विधानसभा, विधानपरिषदेतील ९० टक्के पेक्षा जास्त लोकांनी दादांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले. दादांनी जी भूमिका घेतली ती वारंवार स्पष्टपणे मांडली आहे.

राज्याच्या सत्तेत आणि एनडीएमध्ये सहभागी होत असताना ज्या मूळ वैचारीक विचारधारांसोबत घेऊन सर्वांनी आपले राजकीय जीवन उभं करण्याचा प्रयत्न केला. आमच्या राजकीय जीवनात जो सिध्दांत घेऊन वाटचाल केली. तो धर्मनिरपेक्ष विचार महाराष्ट्राच्या शाहू – फुले – आंबेडकरांचा विचार या विचारांशी जराही तडजोड न करता राज्यातील सत्तेत व एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ही स्पष्ट भूमिका अजितदादांनी मांडली होती. आपल्या या निर्णयाचा समज- गैरसमज जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने विरोधकांकडून केला जात आहे. उद्याच्या निवडणूका जवळ येतील त्यावेळी टिकेची धार वाढवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होईल. मात्र आपण जबाबदार आणि ओबीसींचे नेतृत्व जिल्हयात करता म्हणून विश्वासाने ही भूमिका का घेतली याचे उत्तर आपल्याकडे असायला हवे असेही सुनिल तटकरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

२०१४ मध्ये निवडणूकीचे निकाल लागले. निकाल येण्याअगोदरच भाजपला आपण बाहेरुन पाठिंबा जाहीर केला होता. त्यावेळी मी अध्यक्ष होतो आणि खासदार प्रफुल पटेल राष्ट्रीय सरचिटणीस होते. आम्ही दोघांनी पक्षाची अधिकृत भूमिका मांडली होती असेही सुनिल तटकरे म्हणाले.

२०१९ मध्ये भाजप – शिवसेना विधानसभा आणि लोकसभा एकत्र लढले. मात्र बहुमत असताना काही दुय्यम फळी आपल्या विरोधात बोलते परंतु भाजप व शिवसेनेला जनतेचा कौल होता. आम्हाला नव्हता परंतु मुख्यमंत्री पदावरून वेगळे घडले. त्यावेळी बहुमत असताना महाराष्ट्राच्या इतिहासात निवडणूकीनंतर दुसर्‍यांदा राष्ट्रपती राजवट राज्यात आली. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार होते. आज काही लोक सिध्दांतावर बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु प्रखर हिंदूत्व असलेल्या शिवसेनेला कॉंग्रेस कसा पाठिंबा देऊ शकतो असा सवालही सुनिल तटकरे यांनी उपस्थित केला.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याण आखाडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुधे आणि ओबीसींचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

https://youtu.be/j_RAemrZOnM?si=AzEv6lHWz-E94ZLF

महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादी काँग्रेसने लोकशाहीची तत्त्वे आणि जनतेची इच्छा सातत्याने जोपासली आहे – राष्ट्रवादी

निवडणूक आयोगाचा पेपर फुटलेला नाही तर हा पेपर स्वच्छ समोर आहे – Sunil Tatkare

राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या अडचणी व समस्या राज्यपालांनी सोडवाव्यात :- Nana Patole