सोमय्या हल्ला प्रकरणी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांसह तीन नगरसेवकांना अटक

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांवर (BJP leader Kirit Somaiya) झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Former Mayor of Mumbai Vishwanath Mahadeshwar) यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी खार पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह तीन नगरसेवकांना अटक केल्याची माहिती देखील समोर आली आहे.

किरीट सौमय्या हल्लाप्रकरणात माजी महापौर आणि काही शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाडेश्वर यांच्यासह पोलिसांनी तीन नगरसेवकांना देखील अटक केली आहे. किरीट सोमय्या हल्ल्याप्रकणी पोलिसांनी चार जणांना पोलिस स्थानकात बोलवले आहे. यामध्ये विश्वनाथ महाडेश्वर, हाजी खान, चंद्रशेखर वैगणकर दिनेश कुबल (Haji Khan, Chandrasekhar Vaigankar Dinesh Kubal) यांना अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.