आदित्य ठाकरेंसारख्या बालकांसाठी सरकारी योजनांमधून हॉर्लिक्स, कॉम्प्लान किंवा बूस्ट देण्याची व्यवस्था करावी – मनसे

पुणे  – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park)पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर तसेच महाविकास आघाडीला देखील फैलावर घेतले. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीच्या ढोंगीपणाचा अक्षरशः बुरखा फाडला.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या नावाखाली मतदारांची कशी फसवणूक झाली हे सप्रमाण सांगितले. गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात दोन वर्षांनंतर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था आदी प्रश्नांवरून महाविकास आघाडीचे वाभाडे काढले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी आरसा दाखवल्याने महाविकास आघाडी सरकारमधल्या तिन्ही पक्षांनी राज यांच्या भाषणावर सडकून टीका करायला सुरुवात केली असताना  आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपले काका राज ठाकरे आणि मनसेवर टीका केली आहे. ‘मनसे ही भाजपची ‘सी’ टीम आहे. आतापर्यंत मी त्यांना टाइमपास टोळी म्हणायचो. पण मला आनंद आहे की, आता या टोळीला काम मिळालं.’ असं म्हणत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंच्या मनसेवर जोरदार टीका केली.

दरम्यान, आता या टीकेला मनसेचे नेते आशिष देवधर यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, वडीलांच्या जीवावर कुरघोडी करून एक बालक मंत्रिपद मिळवतो आणि आपला बालहट्ट पूर्ण करतो. एखाद्या अभिनेत्याच्या मर्डर केस मधे नाव येणं , ड्रग्स पेडलर सोबत नाव जोडलं जाणं ,५०लाखाचे घड्याळ असो किंवा केम छो वरळी आणि नाईटलाईफ सुरू करणे असे पराक्रम गाजवलेल्या बालकाकडून अजून काय अपेक्षा करू शकतो…!५० + वयोमानाच्या असलेला प्रादेशिक पक्षाचे नेतृत्व मिळाले पण अजून सुद्धा सत्तेत येण्यासाठी एक किंवा जास्त पक्षाच्या कुबड्या वापरणाऱ्यांनी इतरांना B टीम, C टीमचे प्रमाणपत्रे वाटणे हे फक्त केविलवाणे नाही तर हास्यास्पद सुद्धा आहेऐन तारुण्यात आपल्या चिरक्या आवाजात राजकीय भूमिका मांडताना त्या बालकाला किती कसरत करावी लागत असेल??असा खोचक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

मनसे ही भाजपाची ‘सी’ टीम म्हणून काम करते हे वक्तव्य करणारी व्यक्तीच बर्फाळ प्रदेशातील पेंग्विन दमट वातावरण असलेल्या मुंबईमधे आणायची कल्पना करू शकते त्यावरून त्यांची वैचारिक पातळी आपण समजू शकतो. त्यामुळे या बालकात प्रगल्भता अजूनही आलेली नाही हेच यातून समजून येते. आता सरकारी योजनांमधून अशा बालकांसाठी हॉर्लिक्स, काँप्लान किंवा बूस्ट देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी आहे. So I appeal you…Grow up Kid..! असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.