अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना कायमस्वरूपी पक्क्या घरकुलाचा लाभ कसा मिळू शकतो? 

पारधी घरकुल योजना

पारधी घरकुल योजना अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी आहे. ग्रामसभेने निवड केलेल्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची अंतिमतः निवड करण्यासाठी घरकुल निर्माण समिती आहे. अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना कायमस्वरूपी पक्क्या घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना आहे.

योजनेसाठी अटी:(Conditions for the scheme)

■लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेस देण्यात आला असून अंतिम निवड जिल्हास्तरीय समितीमार्फत.
■लाभार्थ्यांचे महाराष्ट्रातील वास्तव्य किमान पंधरा वर्षाचे असावे.
■सक्षम अधिकाऱ्याने प्राधिकृत केलेला जातीचा दाखला असावा.
■लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्यांच्याकडे पक्के घर नसावे.
■कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा कमाल १ लाख २० हजार रूपये
■लाभार्थी सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण प्राधान्य क्रम यादीच्या निकषाबाहेरील असावा.

योजनेअंतर्गत लाभ:(Benefits under the scheme)
■घरकुलासाठी प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान-१ लाख २० हजार रूपये, नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी १ लाख ३० हजार

अधिक माहितीसाठी संपर्क: प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव , ता. आंबेगाव जिल्हा पुणे/ संबंधीत तालुका गटविकास अधिकारी, पंचायत समिती