‘दोन आरोपी चौकशीला जाण्यापूर्वी भेटूच कसे शकतात ?’

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंह व सचिन वाझे हे चांदिवाल कमिशनसमोर चौकशीला जाण्यापूर्वी भेटले अशी माहिती मिळतेय हे नियमाला धरुन नाही. चौकशीला जाणारे दोन व्यक्ती वा आरोपी अशा प्रकारे भेटू शकत नाहीत अशी नियमावली आहे. मग अशा परिस्थितीत ते दोघे का भेटले? कशासाठी भेटले? याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना लोंढे म्हणाले की, परमवीरसिंह व सचिन वाझे हे दोघेही अनेक प्रकरणात आरोपी आहेत. आणि अशा पद्धीतीने दोन आरोपीमध्ये चर्चा होणे गंभीर आहे, यामुळे चौकशीमध्ये बाधा पोहचू शकते. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची घटना कधी घडली नाही.

जर असं झालं असेल तर याची खोलात जाऊन चौकशी झाली पाहिजे. परमवीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यामध्ये काय चर्चा झाली? त्यांच्या भेटीमागे कोण आहे? त्यात काय कट शिजला? हे जनतेच्यासमोर आलं पाहिजे असे लोंढे म्हणाले.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

अनुदान सहाय्यतेत मोदी सरकारची महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक : सचिन सावंत

Next Post

सोलापूर जिल्ह्यात ‘या’ योजनेचा झाला तब्बल 57 हजार 80 रुग्णांना झाला लाभ

Related Posts
uddhav

…तर त्या मंत्र्यांचा कडेलोट करण्याचीही हिम्मत सरकारनं दाखवावी; चित्रा वाघ यांची खोचक टीका

मुंबई – राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे मंत्रालयासमोरील शासकीय बंगल्यांची नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत क्रमांकांवरून ओळखले जाणारे…
Read More
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही फूट नाही! शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांची नवी दिल्लीत भेट

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही फूट नाही! शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांची नवी दिल्लीत भेट

Sharad Pawar Meets Praful Patel: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने नवी…
Read More
Pankaja Munde - Chitra Wagh

विधानपरिषद निवडणूक : पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांच्या पदरी निराशा; भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली – विधानपरिषद निवडणुकीसाठी (MLC election) भाजपने आपल्या चार उमेदरवांची नावे निश्चित (BJP decide four names for MLC Vidhan Parishad…
Read More