नवनीत राणांचे आक्षेपार्ह छायाचित्र सोशल मीडियावर केले व्हायरल; 5 जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा

चंद्रपूर – खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) या गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या (CM Uddhav Thackeray) घरासमोर हनुमान चालीसा (Hanumaan chalisa) पठणाचा त्यांनी दिलेला इशारा आणि त्यानंतर त्यांना आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांना झालेली अटक यामुळे त्या बऱ्याच चर्चेत राहिल्या. या दरम्यान त्यांना सोशल मिडीयावर ट्रोल देखील करण्यात आले. यातच नवनीत राणा यांचे आक्षेपार्ह छायाचित्र सोशल मीडियावर (Offensive photo on social media) प्रसारित करुन त्यांची बदनामी केल्याप्रकरणी राजा पेठ पोलिसांत (Raja Peth Police Station ) तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी चंद्रपूर व इतर ठिकाणच्या पाच जणांविरुद्ध गुरुवारी (दि. २८) अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल केला आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

खासदार नवनीत राणा यांचे स्वीय सहायक विनोद गुहे (PA Vinod Guhe) यांनी या प्रकरणी गुरुवारी (दि. २८) राजा पेठ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, चंद्रपूरकर निखिल काटोले, प्रवीण पराड, शेखर तायडे, एक महिला तसेच नीलेश माटेकर यांनी सोशल मीडियावर खासदार राणा यांच्या संदर्भात आक्षेपार्ह छायाचित्र तसेच कॉमेंट (Comment) प्रसारीत केल्या आहेत. त्यामुळे अनेकांकडून त्यावर आक्षेपार्ह कॉमेंट येत आहे.

या प्रकारामुळे खासदार राणा यांची प्रतिमा मलिन करण्यासोबतच चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे वरील व्यक्तींविरुद्ध तसेच सोशल मीडियावरील काही गृपवर सुद्धा असे आक्षेपार्ह छायाचित्र, मजकूर टाकलेला आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत करुन बदनामी केल्याप्रकरणी अमरावतीत पाच जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.