लग्नाआधी होणाऱ्या पतीशी बोलताना या गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर नातं सुरू होण्यापूर्वीच संपेल

How To Start Conversation With Fiance: पती-पत्नीमधील गोष्टी जितक्या स्पष्ट आणि पारदर्शक असतील तितके नाते अधिक घट्ट होते. म्हणून, आयुष्यभर एकमेकांशी वचनबद्ध होण्याआधी गोष्टींवर मोकळेपणाने चर्चा करणे महत्वाचे आहे. पण या काळात काही गोष्टींची विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे. विशेषतः मुलींना, कारण लग्नानंतर त्यांना आपलं कुटुंब सोडून नवऱ्याच्या घरी जावं लागतं. जिथे गोष्टी अपेक्षांपेक्षा पूर्णपणे भिन्न असू शकतात. लग्नापूर्वी किंवा पतीला चांगल्या प्रकारे समजून घेतल्याशिवाय करू नयेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी? (Reltionship Tips)

भावनांनी वाहून जाऊ नका
मुली खूप भावूक असतात. विशेषत: जेव्हा तिच्या जोडीदाराचा विचार होतो तेव्हा ती मनापासून विचार करते. अशा परिस्थितीत अनेक मुली लग्नाआधी आपल्या भावी पतींना आपल्या आई-वडिलांबद्दलच्या चांगल्या-वाईट गोष्टी सांगतात. ज्याचा परिणाम त्यांना लग्नानंतर त्यांच्या माहेरच्या घराबाबत टोमणे मारण्यात येतो. तुमच्या घरातील कोणत्याच गोष्टी भावनात वाहून तुमच्या होणाऱ्या पतीला सांगू नका. यामुळे तुम्हालाच त्रास होईल.

​सासरच्या लोकांबद्दल वाईट बोलू नका
लग्नाला बराच वेळ उरला असेल तर मुलगा-मुलगी प्रत्येक मुद्द्यावर अगदी मोकळेपणाने बोलू लागतात. अशा परिस्थितीत मुलींनी आपल्या भावी पतीला त्याच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल वादग्रस्त काहीही बोलू नये याची काळजी घेतली पाहिजे. फक्त सासरच्याच नाही कोणत्याही व्यक्तीबद्दल वाईट बोलू नये.

पूर्वीच्या नातेसंबंधांवर चर्चा करू नका
प्रत्येकाचा भूतकाळ असतो यात शंका नाही, पण इतरांनी तो खुल्या मनाने स्वीकारावा अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. म्हणून, तुमच्या जोडीदारासोबत भूतकाळ शेअर करण्यापूर्वी, त्याची/तिची समज नीट तपासणे महत्त्वाचे आहे. तुमच्या जोडीदाराला घाईघाईने काहीही सांगू नका किंवा विचारू नका ज्यामुळे तुमच्या भविष्याच्या शक्यता नष्ट होऊ शकतात. एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही भूतकाळ बदलू शकत नाही त्यामुळे त्या गोष्टींबद्दल सतत बोलणं चुकीच ठरू शकतं.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा