नवरात्रीची पहिली माळ; देवी शैलपुत्रीच्या रूपात दिसली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री- Video

Navratri Special: प्रत्येक देवी भक्त नवरात्रीची आतुरतेने वाट पाहत असतो. यंदा शारदीय नवरात्री १५ ऑक्टोबरपासून सुरू होत असून, २४ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. संपूर्ण ९ दिवस भगवती देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीनिमित्त मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्रीही सोशल मीडियावर काही खास पोस्ट शेअर करताना दिसतात. अनेक अभिनेत्री त्या त्या रंगातील वेशभूषेचे फोटो शेअर करताना दिसतात. तर काही अभिनेत्री देवींची रूपं घेऊन त्यांचे फोटो शेअर करतात. असेच एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने नवरात्रीनिमित्त खास व्हिडिओ शूट केलं आहे.

ही अभिनेत्री भगव्या रंगाच्या नऊवारी साडीत दिसत आहे. तिने देवी शैलपुत्रीचं रूप (Shailputri Attire) घेतलं आहे. कपाळी हळद आणि त्यावर ठसठसून उठून दिसणारं कुंकू, नाकात मोठीशी नथ आणि डोळ्यात अंगार, अंगभर दागिने घालून ही अभिनेत्री चाहत्यांच्या भेटीला अली आहे. ही अभिनेत्री आहे मराठमोळी मेघा घाडगे (Megha Ghadge). अभिनेत्रीच्या या फोटोशूटला चाहत्यांकडून सोशल मीडियावर चांगली दाद मिळत आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा