छगन भुजबळ शिवसेनेत असते तर नक्की मुख्यमंत्री झाले असते – उद्धव ठाकरे

मुंबई – छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) म्हणाले की, देशाचा व भुजबळांचा अमृतमहोत्सव हा योगायोग म्हणावा लागेल. कोणी तीन वर्षांपुर्वी सांगितले असते या सोहळ्याला मी उपस्थित राहिल तर कोणाचा विश्वास बसला नसता. पण नियतीच्या मनात हेच होतं. आज प्रत्येकाच्या हातात मशाल देण्याची गरज आहे. भुजबळ शिवसेनेत असताना मशाल चिन्हावर निवडून आले. अजीत पवार यांनी सांगितले की, भुजबळ सरकार वाचविण्यात वाकबगार आहे. हे तेव्हाच सांगायचे होते. कामाला लावले असते असे म्हणताच सभागृहात हास्याचे फवारे उडले.

ते म्हणाले की, भुजबळांनी शिवसेना सोडली हा आमच्यासाठी मोठा धक्का होता. यातून सावरायला मोठा वेळ लागला. पण नंतर बर झालं तुम्ही मातोश्रीवर येत हे मतभेद मिटवले. हे पहायला मा हव्या होत्या असे सांगत. भुजबळ हे वयाने तरुण आहेत. सेनेमध्ये असताना कधी त्यांनी दुरुपयोग केला नाही. त्यांनी जिद्दिने वाटचाल केली. अडीच वर्षांपुर्वी महाविकास आघाडीचा प्रयोग देशाने पाहिला. तुमचे मार्गदर्शन लाभले. पण सध्या वैचारीक उंची पहायला मिळत नाही. वैचारीक एफएसआय जादा असायला हवा. भुजबळ हे डगमगणारे व जिद्दिने उभे राहणारे वादळ आहे. आणखी लढाई लढायची आहे. पुढिल काळात देखील साथ सोबत राहु द्या. तुम्ही तुमची ७५ वर्ष पूर्ण केली. आता पुढच्या ७५ वर्षांनी पुन्हा बोलवा असे सांगत त्यांनी भुजबळांना शुभेच्छा दिल्या.