मोदी हिटलरच्या वाटेवर चालले तर हिटलरप्रमाणे त्यांचाही मृत्यू होईल; काँग्रेस नेता बरळला

नवी दिल्ली – अग्निपथ योजना (Agneepath) आणि राहुल गांधींना ईडीच्या समन्सच्या (ED has issued summons to Rahul Gandhi) निषेधार्थ काँग्रेस जंतरमंतरवर सत्याग्रह करत आहे. यावेळी सलमान खुर्शीद, मल्लिकार्जुन खरगे (Salman Khurshid, Mallikarjun Kharge) यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. दरम्यान, आपल्या भाषणात काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय (Subodh Kant Sahay) यांनी पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुबोध कांत सहाय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केली आहे ‘मोदी हिटलरच्या वाटेवर चालले तर हिटलरप्रमाणे त्यांचाही मृत्यू होईल’, असं वादग्रस्त विधान सहाय यांनी केलं आहे. गेले १० दिवस आपण संघर्षाचा सामना करत आहोत. गेल्या १३५ वर्षांचा इतिहास मोदींना माहीत नाही, पण आपण कोणती परंपरा पाळतो हे काँग्रेसच्या लोकांना माहीत असल्याचे सहाय म्हणाले. तसेच राहुल गांधी यांच्या अंगात दम आहे. डोळ्यात डोळे घालून जर कोणी बोलू शकतं ते राहुल गांधी असल्याचे सहाय म्हणाले.