खडसे, अहिर, राम शिंदे, खापरे, भारतीय यांचा विधान परिषद निवडणुकीत विजय

मुंबई – अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल समोर आला असून उमेदवार एकनाथ खडसे, उमा खापरे,श्रीकांत भारतीय, राम शिंदे, रामराजे नाईक निंबाळकर,प्रवीण दरेकर, सचिन अहिरे, (Eknath Khadse, Uma Khapre, Srikant Bharatiya, Ram Shinde, Ramraje Naik Nimbalkar, Praveen Darekar, Sachin Ahire) हे  विजयी झाले आहेत. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे (Pravin Darekar, Ram Shinde, Srikant Bharatiya and Uma Khapre) यांनी २६ मतांचा कोटा पूर्ण केला.

शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांनीही २६ मतांचा कोटा पूर्ण केला. यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनीही पहिल्याच फेरीत विजयाच्या २६ मतांचा कोटा पूर्ण केला. रामराजे शिंदे यांचे एक मत बाद ठरुनही त्यांनी विजयाचा कोटा पूर्ण केला.