महिलांच्या कर्तत्वाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील – अब्दुल सत्तार

पुणे : महिलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. महिलांच्या सर्वांगिण आणि परिपूर्ण विकासासोबतच महिला शक्तीचा सन्मान व्हावा व त्यांच्या कर्तत्वाला चालना देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. एसएनडीटी महाविद्यालयाच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्सच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या प्रशासकीय कार्यालयाचे उदघाटन राज्यमंत्री सत्तार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ.मुक्ताजा मिटकरी, चर्चगेट एसएनडीटी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव, डॉ. दिनेश परदेशी, भरत राजपुत उपस्थित होते.

सत्तार म्हणाले, महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनामार्फत विविध योजना योजना राबविल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थीनी, तरूणी, नोकरी करणारी महिला,वयोवृद्ध महिला,गृहीणी आदींनी स्वावलंबी व आत्मविश्वासाने जीवन जगण्याची उर्मी मिळत आहे. ग्रामीण भागात बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम प्राधान्याने सुरू आहे.

एसएनडीटी महाविद्यायालतील होम सायन्स विभागाच्या मदतीने महिलांना विविध क्षेत्रात रोजगार मिळाला आहे. राज्यातील महिलांना सक्षमीकरण तसेच रोजगाराचे धडे देण्याचे काम महाविद्यालयाच्या माध्यमातून होत आहे. या महाविद्यालयाची देशभर ओळख आहे. त्यादृष्टीने अधिकाधिक सोईसुविधा मिळाव्यात तसेच महाविद्यालयाच्या अडचणी सोडविण्यासाठी मंत्रालय स्तरावर लवकरण बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कोरोना कालावधीत महिलांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगून सत्तार म्हणाले, राज्यात कोरोना कालावधीत कोरोना संसर्ग रोखण्यासोबतच उपाययोजना करण्यात अनेक महिला सरपंच, नगराध्यक्षा तसेच विविध क्षेत्रातील महिलांनी अनेक नाविण्यपूर्ण योजना राबविल्या आहेत. आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांचे योगदान महत्तवूपर्ण असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

प्राचार्य डॉ.मुक्ताजा मिटकरी यांनी एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्सच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची तसेच अभ्यासक्रमाची माहिती दिली. यावेळी महविद्यालयातील विविध विभागाचे प्रमुख आणि विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

एका दिवसात एका चित्रपटगृहात झिम्माचे १८ खेळ हाऊसफुल्ल! लॅाकडाऊननंतर चित्रपटगृहांमध्ये सुपरहिट ठरलेला पहिला मराठी चित्रपट

Next Post

वृध्दापकाळात वयोवृध्दांना कृत्रिम अंग साहित्यामुळे मिळणार आधार – रामदास तडस

Related Posts
जनतेचं ठरलंय, वडगाव शेरीत मशालच; ठाकरेंच्या वाघाच्या समर्थनार्थ बॅनरबाजी | Vadgaon Sheri

जनतेचं ठरलंय, वडगाव शेरीत मशालच; ठाकरेंच्या वाघाच्या समर्थनार्थ बॅनरबाजी | Vadgaon Sheri

Vadgaon Sheri Vidhansabha election 2024 : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती…
Read More
चंद्रकांत खैरे

‘भाजपा ईव्हीएम नियंत्रित करून नव्हे तर सर्वसामान्य जनतेची सेवा करत मन जिंकून विजय मिळवते’

मुंबई : आगामी सर्व निवडणुका मतपत्रिकेद्वारे घ्या अशी आग्रही भूमिका शिवसेना उबाठा पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी गडचिरोलीत…
Read More