हिम्मत असेल तर विधानसभेची निवडणुक घ्या, आम्ही चूक केली असेल तर शिक्षा मिळेल –  ठाकरे 

Mumbai – विधिमंडळातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण जाण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्के देणे सुरूच आहे.

या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.ते म्हणाले,  कायद्याच्या दृष्टीने धनुष्यबाण कुणी हिरावून घेऊ शकत नाही. पण नुसत धनुष्य बाण चिन्ह असलेल्या माणसाचा लोक मतदानात विचार करता. धनुष्यबाण कुणी दूर करु शकत नाही. नगरसेवक गेले पण महापालिका अस्तित्वात नाही. गेले ते त्यांचे समर्थक. काल शिवसेना (Shivsena) महिला जिल्हा प्रमुख त्यांच्या डोळ्या अश्रु होते. शिवसेनेने आजवर साध्या माणसाला मोठे केले ह्याचा अभिमान. यांच्यामुळे ज्यांना मोठेपण मिळाले ते गेले. साधी माणसं जोवर शिवसेने सोबत तोवर धोका नाही.

ते म्हणाले, मतदार शेवटी रस्त्यावरच्या पक्षाला मते देतात. आमदार जाऊ शकतात पक्ष नाही. तुम्ही भ्रमात जाऊ नका विधीमंडळ पक्ष वेगळा. धनुष्यबाण आपल्याकडेच राहील. जे सोबत राहिलेत त्यांचे जाहीर कौतुक. काही झाले तरी ते हटले नाहीत. अजूनही देशात असत्यमेव जयते नसून सत्यमेव जयते (Satyamev jayate) आहे. उद्याची याचिका देशातील लोकशाही किती मजबूत असणार आहे, माननीय बाबासाहेबांच्या घटनेवर आहे की नाही लोकशाहीवर आहे की नाही यावर असणार आहे. कायदा घटनेप्रमाणे जे व्हायचे ते होईलच.

मातोश्रीने (Matoshree) सन्माने बोलावले तर आम्ही जाऊ असे म्हणाले, त्यांना प्रेम आजही आहे त्यासाठी धन्यवाद. गेली काही वर्ष तुम्ही आज ज्यांच्याकडे गेलात ते ठाकरे कुटुंबियांच्या बद्दल बोलले. तुम्ही त्यांच्या मांडीवर बसलात. अश्या लोकांच्या सोबत तुम्ही स्वागत स्वीकारताहेत. आज अनेक मुद्दे आहेत पण मी सगळे बोलणार नाही. काही दिवसात सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेईल. अनेक अनोळखी व्यक्ती सोबत पाठिंबा दर्शवताहेत.हिम्मत असेल तर त्यांनी  विधानसभेची निवडणुक (Assembly elections) घ्यावी. आम्ही चूक असू तर शिक्षा मिळेल. तेव्हा मुख्यमंत्री पद दिले असते तर हजारो कोटी खर्च करावे लागले नसते. माझ्याकडून वाद विवाद नको. अडीच वर्ष आपल्यावर टीका होत असतांना तुम्ही गप्प होतात.