पाकड्यांचे शेपूट वाकडेच; पाकिस्तान रेंजर्सच्या गोळीबारात हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू

Pakistan Firing – नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने (Pakistan) अलीकडे केलेले युद्धविराम उल्लंघन आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळी बाराच्या घटना हे द्विपक्षीय करारांचे उल्लंघन आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काल स्पष्ट केलं. जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील रामगढ सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान रेंजर्सनी केलेल्या बेछूट गोळीबारात काल बीएसएफच्या एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला.

युद्धविरामाचे उल्लंघन आणि सीमेपलीकडून घुसखोरी, काहीवेळा ड्रोन आणि गोळीबार यासारख्या घटना द्विपक्षीय करारांचे उल्लंघन आहेत आणि आम्ही नेहमीच आवाज उठवत असतो. गेल्या तीन आठवड्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान रेंजर्सकडून युद्धविरामाचं उल्लंघन करण्याची ही तिसरी घटना आहे अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिली.

महत्वाच्या बातम्या-

प्रदूषणात घराबाहेर पडत असाल तर ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; दुष्परिणामांपासून करा स्वत:चा बचाव

पूर्ण कुटुंबासह परिणीती चोप्रा पोहोचली हनीमूनला, मालदीवमध्ये सासूसोबत पोज देताना दिसली

नास्तिक असलो तरीही रामसीतेच्या देशात जन्मल्याचा मला अभिमान आहे- जावेद अख्तर