IND VS ENG | सलग दोन कसोटीत Yashaswi Jaiswal चे द्विशतक, असे करणारा ठरला तिसरा भारतीय

IND VS ENG : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वी जैस्वालचा ( Yashaswi Jaiswal) उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या (IND VS ENG) सामन्यात त्याने द्विशतक झळकावले. यशस्वीने दुसऱ्या डावात नाबाद 214 धावा केल्या. तर सर्फराज खानने (Sarfaraz Khan) नाबाद 68 धावा केल्या. यशस्वीने सलग दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावले.

सलग दोन कसोटीत द्विशतक झळकावणारा यशस्वी हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. त्याने या बाबतीत विनोद कांबळी आणि विराट कोहलीची बरोबरी केली. कांबळीने 1992-93 मध्ये ही कामगिरी केली होती. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याने इंग्लंडविरुद्ध 224 धावा केल्या होत्या. त्यानंतर दिल्लीत त्याने झिम्बाब्वेविरुद्ध 227 धावांची इनिंग खेळली. त्याच्यानंतर कोहलीचा नंबर लागतो. विराटने 2017-18 मध्ये श्रीलंकेविरुद्ध नागपुरात 213 आणि दिल्लीत 243 धावा केल्या होत्या. आता यशस्वी त्यांच्या यादीत सामील झाला आहे. यशस्वीने विशाखापट्टणम येथे इंग्लंडविरुद्ध 209 धावा केल्या होत्या. आता राजकोटमध्ये 214 नाबाद धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या

Lok Sabha Elections | भाजपचे आजपासून राष्ट्रीय अधिवेशन; लोकसभा निवडणुकीचा रोडमॅप तयार

Rooftop Solar Scheme | घराच्या छतावर सोलर पॅनेल लावायचे आहेत? बँका गृहकर्ज देऊन वित्तपुरवठा करणार आहेत

‘भाजपामुळे राज्याची संस्कृती बिघडली, चिखलफेकीसाठी टोळ्या भाड्याने…’; चिपळूणच्या राड्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया