Jay Shah ची चेतावणी, पण इशान किशनचा कानाडोळा; भारतीय क्रिकेटरच्या समस्या वाढणार?

Ishan Kishan, Jay Shah Letter : भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचे सध्या चुकीच्या वागणुकीमुळे चर्चेत आहे. त्याने स्वतःच्या इच्छेने क्रिकेट मधून ब्रेक घेतला होता. यानंतर त्याने बीसीसीआय (BCCI), संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक आणि आपल्या घरच्या संघालाही काहीही सांगितले नाही.

ईशानचा प्लॅन काय आहे हे कोणालाच माहीत नाही. घरच्या संघाकडून तो रणजी करंडकही खेळला नव्हता. ईशानच्या या वृत्तीने बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन चांगलेच संतापलेले दिसत आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही अनेकवेळा हातवारे करून हे सूचित केले आहे.

जय शहा यांनी खेळाडूंना पत्र लिहिले
पुन्हा एकदा जय शहा (Jay Shah) यांनी सर्व खेळाडूंना पत्र लिहून स्पष्ट केले आहे की, देशांतर्गत क्रिकेट हे बोर्डासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर एखाद्या खेळाडूने आयपीएलला प्राधान्य दिले आणि देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष केले तर ते त्याच्यासाठी चांगले होणार नाही. याचे परिणाम वाईट होतील.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी करारनामा पत्र लिहून देशांतर्गत क्रिकेट न खेळणाऱ्या भारत अ संघाच्या खेळाडूंना ताकीद दिली आहे. राष्ट्रीय संघात निवड होण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट हा महत्त्वाचा निकष बनला असून त्यात सहभागी न झाल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा जय शाह यांनी क्रिकेटपटूंना पत्र लिहून दिला आहे.

देशांतर्गत क्रिकेटपेक्षा आयपीएलला प्राधान्य देणे चुकीचे आहे
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, आजकाल काही खेळाडू घरगुती रेड-बॉल क्रिकेटला कमी आणि आयपीएलला जास्त प्राधान्य देऊ लागले आहेत. त्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. यामुळेच जय शहा यांना पत्र लिहावे लागले. त्यांनी पत्रात लिहिले की, ‘अलीकडे एक ट्रेंड समोर आला आहे, जो चिंतेचा विषय आहे. काही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटपेक्षा आयपीएलला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे.

जय शहा म्हणाले, ‘हा बदल अपेक्षित नव्हता. भारतीय क्रिकेट हे देशांतर्गत क्रिकेटच्या पायावर उभे आहे आणि त्याला कधीही कमी महत्त्व दिले गेले नाही. भारतीय क्रिकेटबद्दलची आमची दृष्टी पहिल्यापासूनच स्पष्ट आहे. भारताकडून खेळू इच्छिणाऱ्या प्रत्येक खेळाडूला देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करावे लागेल. टीम इंडियात निवडीसाठी देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी महत्त्वाची असते. देशांतर्गत क्रिकेट न खेळण्याचे गंभीर परिणाम होतील.

महत्वाच्या बातम्या

Nitesh Rane | पहिल्या दिवसापासून जरागेंना सांगतोय राजकीय टीका करु नका, भाजप नेते नितेश राणेंचा इशारा

Manoj Jarange Patil यांची तब्येत महत्वाची, त्यांच्या प्रकृतीला काय झाले तर जबाबदार कोण? – पृथ्वीराज चव्हाण

Devendra Fadnavis | “मला अनेकदा वाटतं अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावावी असं वाटतं”, देवेंद्र फडणवीस काय बोलून गेले?