‘भाजपामुळे राज्याची संस्कृती बिघडली, चिखलफेकीसाठी टोळ्या भाड्याने…’; चिपळूणच्या राड्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut : महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri) चिपळूणमध्ये भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली, त्यानंतर शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये भाजप आणि शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. हा गोंधळ इतका वाढला की नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. यावर शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, भाजपामुळे (BJP) राज्याची संस्कृती आणि संस्कार पूर्ण बिघडले आहेत. चिखलफेक करण्यासाठी भाजपने काही टोळ्या भाड्याने घेतल्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती होती. यशवंतराव चव्हाणांपासून ते आतापर्यंत त्या संस्कृतीवर नशेच्या, दारूच्या, अनैकतेच्या गुळण्या टाकण्याचे काम भाजपने काही भाडोत्री लोकांकडून सुरु केले आहे.

महाराष्ट्राची संस्कृती लयाला जातेय
आम्ही सुद्धा कठोर शब्दांचा वापर करतो. आमच्याकडून एखादा-दुसरा शब्द चुकीचाही जात असेल. मात्र ज्या पद्धतीने भाजपने जो दारूखाना सुरु केलाय. त्यावरून मला महाराष्ट्राची संस्कृती लयाला जाताना दिसत आहे. त्याला जबाबदार पूर्णपणे देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी आणि त्यांचा सध्याचा भारतीय जनता पक्ष आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

Nitesh Rane | पहिल्या दिवसापासून जरागेंना सांगतोय राजकीय टीका करु नका, भाजप नेते नितेश राणेंचा इशारा

Manoj Jarange Patil यांची तब्येत महत्वाची, त्यांच्या प्रकृतीला काय झाले तर जबाबदार कोण? – पृथ्वीराज चव्हाण

Devendra Fadnavis | “मला अनेकदा वाटतं अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावावी असं वाटतं”, देवेंद्र फडणवीस काय बोलून गेले?