Rohit Pawar | अजित पवार हे जेलमध्ये जायला लागू नये म्हणून भाजप सोबत गेले; रोहित पवारांचा दावा

Rohit Pawar On Ajit Pawar: राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीनंतर काका अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध पुतण्या रोहित पवार (Rohit Pawar) असा संघर्ष पाहायला मिळत आहे. यातच आता पुन्हा एकदा रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर तोफ डागली आहे. अजित पवार हे जेलमध्ये जायला लागू नये म्हणून भाजप सोबत गेले असा दावा त्यांनी केला आहे.

अजित पवारांचं घ्या किंवा इतर सर्व नेत्यांचं घ्या त्यांच्यावर काय- काय कारवाया झाल्या हे सर्वांना माहीत आहे. त्यांना जेलमध्ये जाण्याची भीती होती. जेलमध्ये जायला लागू नये म्हणून ते भाजपसोबत गेले. भाजप सोबत जाण्यासाठी मलाही काही ऑफर असतील ना? असं सूचक विधानही त्यांनी केलं.ते आळंदी येथे बोलत होते.

महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी ८४ वर्षाचे शरद पवार लढत आहेत. मग आपण पळून जाऊन कसे चालेल. मराठी माणूस हा कधी पळून जात नाही. हे आपण ऐकलं आणि पाहिलं आहे. आम्ही देखील जेलला घाबरत नाही. कारण आम्ही काही चुकीचं केलंच नाही. असं रोहित पवार (Rohit Pawar) यांनी स्पष्ट केले. लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

Lok Sabha Elections | भाजपचे आजपासून राष्ट्रीय अधिवेशन; लोकसभा निवडणुकीचा रोडमॅप तयार

Rooftop Solar Scheme | घराच्या छतावर सोलर पॅनेल लावायचे आहेत? बँका गृहकर्ज देऊन वित्तपुरवठा करणार आहेत

‘भाजपामुळे राज्याची संस्कृती बिघडली, चिखलफेकीसाठी टोळ्या भाड्याने…’; चिपळूणच्या राड्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया